जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे अशासकीय सदस्य हरिष खोमणे, संदीप नवले, सुरेश रास्ते, नेहा पंचामिया, मोहन मते, सचिन मोकाटे, शंभु पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, पोलीस उप अधीक्षक अमृत देशमुख, वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक विजया करांडे, देहु रोड कॅन्टोन्मेंटचे एम.ए.सय्यद आदी उपस्थित होते.
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री देशमुख म्हणाले, पोलीस, पशुसंवर्धन तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती या सर्वांनी एकत्रित समन्वयाने शहरी तसेच ग्रामीण भागात वन्य प्राणी आल्यास याबाबत मार्गदर्शका तयार करावी, यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा तसेच याबाबत प्रशिक्षण घ्यावे.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी प्राणी क्लेश समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन, पोलीस, वनविभाग तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.