जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावात कडक लॉकडाऊन

0
पुणे : जिल्ह्यात कोरोना संक्रमण झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या वाढताना दिसत आहे. ४२ गावांत कोरोनाबाधित वाढत असल्याने या गावात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात यावा आणि प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.
या मोहिमेत अनेक कोरोनाबाधित आढळले असले तरी तीन आठवड्यांपासून हॉटस्पॉट गावांची संख्या ही कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या आठवड्यात हॉटस्पॉट गावे ही १०० च्या आत होती. मात्र, आता ती १०९ वर पोचली आहे. ग्रामीण भागाचा बाधित दर हा ५ च्या खाली अद्यापही आलेला नाही. हॉटस्पॉट बाधित गावातील ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरील सूचना केल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात दोन महिन्यांपासून सक्रिय बाधित रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ही अद्यापही आटोक्यात येत नसल्याने धडक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ४२ गावांत रुग्ण वाढत आहे. ही रुग्णवाढ रोखण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.
रुग्णवाढ होत असलेली गावे
आंबेगाव : जारकरवाडी, जवळे, वळती,
बारामती : चाैधरवाडी, मोरगाव
दौंड : बेटवडी, देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे, केडगाव, लिंगाळी, वरवंड
हवेली : नऱ्हे
इंदापुर : बावडा, हागरवाडी, कळंब, माळवडी, शेटफळगडे
जुन्नर : अळू, बोरी सालवडी (बोरी खुर्द), धोलवड, डिंगोरे, जलवंडी, मालवडी, पादीरवाडी, पिंपरी पेंढार, पूर, शिरोली तर्फे कुंकंदनेर.
खेड : बिराडवाडी, खरपूड, कोयाळी
मावळ : भाजे, काल्हाट, सालुंब्रे, टाकवे खेर
मुळशी : म्हारूंजी, सुस,
शिरूर : कवठे, केंदूर, कोरेगाव भीमा, पाबळ, सादलगाव, सविंदने
Leave A Reply

Your email address will not be published.