मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना पुढिल वर्गात प्रवेश देण्याची घोषणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मधल्या काळात काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या होत्या मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याकारणाने आज शिक्षणमंत्री गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/varshaegaikwad/status/1378288665533710336?s=24