जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनींच्या विद्यार्थ्यांना चांगले यश

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 45 पदकांची कमाई केली.

9 ते 12 डिसेंबर 2022 दरम्यान संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल – इंद्रायणी नगर भोसरी या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण 300 शाळांमधून साधारण 3500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी मधील एकूण 60 खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी 20 सुवर्णपदक,  15 रौप्यपदक  व 7 कांस्यपदक अशा एकूण 45 पदकांची कमाई केली.

मुलांमध्ये वयोगट 14 मध्ये शिवप्रताप कानगुडे या खेळाडूने 80 मीटर अडथळा, थाळी फेक व 4 x 100 मीटर रिले  या खेळ प्रकारात प्रत्येकी सुवर्णपदक मिळवून तिहेरी मुकुटाचा मान मिळवला. तसेच वयवर्ष 14 आणि 17  मुले व मुली  यांनी  4 x 100 मीटर रिले  या चारही खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवले. एकूण 33 खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.