पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 3 लाख 60 हजरांची मागणी; गुन्हा दाखल

0

पुणे : पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कर्तव्यास असलेल्या उपनिरीक्षकाने 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

उपनिरीक्षक बसवराज चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा वाहतूक विभागात चित्ते नेमणुकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांना वाहतूक विभागाची ऐनओसी देण्यासाठी त्यांनी तीन लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे लाचेची तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीने उपनिरीक्षकावर लाच मगितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एसीबीचे पथक करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.