पिंपरी : शाकीर गौसमोहमद जिनेडी पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड हे सन १९८७ मध्ये पोलीस दलात भरती झाले आहेत. पोलीस दलामध्ये त्यांची ३३ वर्षे सेवा केली आहे.त्यामध्ये त्यांनी गुन्हे शाखा, तपास पथकात कर्तव्य बजावले आहे. पोलीस सेवेतील कालावधी मध्ये त्यांनी १०० पेक्षा जास्त अनाधिकृत पिस्टल अशी अग्निक्षस्त्रे जप्त केली आहेत . अग्निशस्त्राचा वापर करुन झालेला खुन तसेच अनोळखी इसमाचा झालेला खुन अशा क्लिष्ट स्वरुपाचे गुन्हयांचा काही एक सुगावा नसताना अंत्यत चिकाटीने कौशल्यपुर्वक तपास करुन गुन्हयांचा छडा लावुन ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चेन स्नॅचिग जबरी चोरी गुन्हयाचे ४२ गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील १५,०००,००रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेकामी मदत केली आहे.

घरफोडी चोरी गुन्हयाचे ११० गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील १,१०,०००,०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कर्तव्य बजावले आहे. सन २०१२ मध्ये पिपंरी पोलीस स्टेशन येथे एका लहान मुलाचे अपहरण झाले. त्याबाबत दाखल झालेल्या गुन्हयाचा ४८ तासाचे आत छडा लावुन एका महिला आरोपीस अटक करण्यास कर्तव्य बजावले आहे . त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांना तत्कालीन मा.गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडुन १०,०००/-रु. रोख पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सन २०२० मध्ये चाकण -शिक्रापुर रोडने एका निळसर रंगाचे फॉक्सवेगन पोलो कार मध्ये अंमली पदार्थ घेवुन जात असल्याची बातमी मिळाल्याने, त्याअनुषंगाने कारवाई करुन पोलो कार नंबर एम.एच .१२ / एमएल / ४७१६ या गाडी मधील २०,०५,२३,१०० / -रु . ( वीस कोटी रुपये ) किंमतीचे २० किलो मेफेड्रॉन ( एम.डी ) हा अंमली पदार्थ जप्त करणेकामी मदत केली आहे. शाकीर जिनेडी यांना सुमारे ४६० रिवॉर्ड प्राप्त झाले आहेत . ते उत्कृष्ट अॅथलॅटीक्स खेळाडु असुन, त्यांना सन १९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला आहे त्यासाठी त्यांना मा.पोलीस महासंचालकांचे सर्वोत्कृष्ट खेळाडुचे पोलीस पदक मिळाले आहे. तसेच राष्ट्रीय पोलीस खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले असुन, त्यांना ०६ सुवर्ण पदक, ०५ रजत पदक व ०२ कास्य पदक मिळाले आहेत.

सन २०१७ मध्ये पोलीस दलातील प्रशंसनीय सेवेसाठी गौरव करुन मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे . शाकीर जिनेडी यांना पोलीस दलातील उल्लेखनिय सेवेबद्दल सन २०२० चे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे .