शहरात म्युकरमायकोसिसच्या 50 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

0

पिंपरी : देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आले, त्यानंतर म्युकरमायकोसिसचे संकट आणि आता डेल्टा प्लसचे संकट ओढवले आहे. असे असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातुन एक समाधानकारक बातमी आहे. या आजारामुळे काही रुग्णांना डोळे गमवावे लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आता आढलेल्या 252 रुग्णांपैकी 202 रुग्णांवर वैद्यकीय उपचार करुन तर 50 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहरात शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 96 रुग्ण बरे झाले. सद्य:स्थितीत 130 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.

ज्या रुग्णांना कोरोनाची गंभीर लक्षणे होती. त्याचबरोबर मधुमेह आहे, अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तीव्र डोकेदुखी, ताप येणे, गालावर सूज येणे किंवा बधिरपणा येणे, नाक गळणे जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे वरच्या जबड्यातील दात हलणे, जबड्यातील टा‌ळू आणि नाकातील त्वचा याचा रंग काळसर होणे, वरच्या जबड्यातील टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे ही म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे आहेत.

महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “म्युकरमायकोसिसची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत”.

Leave A Reply

Your email address will not be published.