पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्यामृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेशण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या.आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला आहे.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंढवा भागातील केशवनगर भागात झालेली घटना जोडप्याला २ मुलं आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणाऱ्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरातील रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे.