पुणे : पुणे विमानतळावर एका विमानाचे टायर फुटले. यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला.
मंगळवारी (दि. 30) दुपारी एक वाजताच्या सुमारास लोहगाव विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका विमानाचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे विमानतळावरील धावपट्टी खराब झाली. त्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले आहे. विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने लोकांना अनेक समस्या येत आहेत.
भारतीय वायू दलाच्या सुखोई विमानाचे टायर फुटले. यामुळे पुणे विमानतळ सुमारे दोन तास बंद होते. काही विमाने मुंबईकडे वळवण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांना अनेक तास विमानतळावर ताठकळत थांबावे लागले.