सुलगणा आणि बिस्वा कल्याण विवाहबंधनात अडकले

0

मुंबई ः बाॅलिवुड अभिनेत्री सुलगणा पाणिग्रही आणि स्टॅण्डअप काॅमेडीन बिस्वा कल्याण रथ हे लग्नाच्या बंधनात अडकलेले आहेत. ९ डिसेंबरला त्यांनी लग्न केले, ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. सुलगणा आणि बिस्वा कल्याण या दोघांनी लग्नाचे व रिसेप्शनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना माहिती दिली.

या फोटोमध्ये बिस्वा कल्याण रथ याने कॅप्शन अशी लिहिली आहे की, ”बिस्वाने माणसासोबत लग्न केले.”, तर दुसरीकडे सुलगना पाणिग्रही हिनेदेखील मजेशीर कॅप्शन दिली आहे की, ”आमच्या सिंगल लाइफला जळतान पहा.”

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर लाईक आणि काॅमेंट्सही भरपूर येत आहेत. मर्डर-२ आणि रेड सिनेमांमध्ये सुलगणा प्रेक्षकांसमोर आलेली आहे, तर अनेक मालिकांमध्येही तिने काम केलेले आहे. तर, काॅमिकस्तानमध्ये आपल्या विनोदांनी बिस्वा कल्याण रथनेदेखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.