मुंबई ः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशांसंबंधीची बातमी समोर आली आहे. सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार नसल्याची आणि राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्याचे कारण सांगून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे रजनीकांत यांनी जाहीर केलेलं आहे. सोशल मीडियावर पत्रक शेअर करत ही मोठी बातमी सांगतलेली आहे.
रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी ३१ डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे आणि जानेवारीत पक्ष लाॅंच करण्याची घोषणा केलेली होती. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केलेले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
रजनीकांत राजकरणात प्रवेश असल्याचे पोस्टर तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात चाहत्यांनी लावलेले होते. त्यामध्ये राजकारणापासून दूर राहण्याच्या त्यांच्य निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा, असं त्यात चाहत्यांनी सांगितलेले होते. रजनीकांत यांच्या निर्यणामुळे आगामी विधान सभेच्या निवडणुकीवर चांगलाच परिणाम पाहायला मिळणार आहे.