पुणे : पुणे पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकरनयांनी केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निंबाळकर, पोलीस हवालदार बाळू रामचंद्र मुरकुटे, पोलीस कर्मचारी शरद नाथा मोकते , महावीर सामसे आणि किशोर चंद्रकांत नेवसे ( सर्व कोर्ट कंपनी, मुख्यालय शिवाजीनगर, पुणे) अशी निलंबित करण्यात आल्यांची नावे आहेत.
येरवडा जेल मधील बंदी वेद प्रकाशसिंग वीरेंद्रकुमार सिंग यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्याला त्याच्या मूळगावी उत्तरप्रदेशमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. निलंबित पोलिसांवर त्याला तेथे नेऊन परत आणण्याची जबाबदारी होती. पोलिसांना 10 मे 2021 रोजी आरोपी पार्टी देण्यात आली होती.
पोलीस त्याला घेऊन उत्तरप्रदेशमध्ये त्याच्या गावी पोहोचले. 15 मे 2021 रोजी बंदी वेदप्रकाशसिंग याने पहाटे 5 ते 6 दरम्यान त्याच्या घराच्या खिडकीचे गज कापून पलायन केले. पोलिसांनी त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.