मुंबई : भारताच्या स्वर कोकीळा म्हणून ओळखल्या जाणार्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
लतादीदी यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढले होते. मात्र शनिवारी त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आणि पुन्हा एकदा लतादिदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
8 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचे चाहते लतादीदी लवकर बर्या व्हाव्यात यासाठी सर्वत्र प्रार्थना करत होते.