शहरातील ‘झुंड’ स्लम सॉकर खेळण्यासाठी नागपूरला रवाना, आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा

0

पिंपरी : ‘झुंड नहीं टीम कहिए’ असे म्हणत झोपडपट्टीतील दिशा भटकलेल्या मुलांना एक फुटबॉल कशी नवी दिशा देतो. हे नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन अभिनित झुंड चित्रपटात दाखविण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मधील खरी खुरी झुंड विजय बारसे यांनी सुरू केलेली स्लम सॉकर ही राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी बुधवारी (दि.29) नागपूरला रवाना झाली. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्पर्धेसाठी निघालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

नागपुर येथे होणा-या स्लम सॉकर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी झोपडपट्टी भागातील मुलांची निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या क्रिडा उपक्रमांतर्गत हद्दीतील 10 उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडूंची निवड झाली आहे. या सर्व खेळाडू व क्रिडा प्रशिक्षक यांना पोलीस आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखवुन पोलीस आयुक्त कार्यालय येथुन नागपुरला रवाना केले. 31 मार्चपासून महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्तांनी मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या शुभेच्छा संदेशात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘खेळ कोणताही असो त्यात हार व जीत होतच असते. तुमची या स्पर्धेसाठी निवड झाली हाच तुमच्यासाठी एक मोठा विजय आहे. खेळाडुंची ही पिढी नवीन दिशादर्शक आहे. तुम्ही झोपडपट्टी भागातील दिशा भरकटलेल्या मुलांसाठी चांगला आदर्श बनणार आहात. आपण खेळ जिंकण्यापेक्षा तो खेळ किती प्रामाणिकपणे खेळलो यातुनच आपल्याला समाधान मिळणार आहे.’

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणा-या विविध गुन्ह्यातील सहभागामध्ये अल्पवयीन (विधीसंघर्षित) बालकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. अशा बालकांना योग्य वेळी समुपदेशन व मार्गदर्शन न केल्यास अशी बालके कायमस्वरूपी गुन्हेगार होण्याची शक्यता

या अनुषंगाने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतुन विधीसंघर्षित बालक व गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांसाठी विशेष बाल पथक क्रिडा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या वतीने गेली दोन वर्षे झोपडपट्टी भागात हा उपक्रम राबविला जात आहे. क्रिडा प्रशिक्षक संदेश बोर्डे यांनी या मुलांना प्रशिक्षण देत एक उत्कृष्ठ फुटबॉल टीम तयार केली आहे.

कार्यक्रमावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप- आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभागाचे डॉ. सागर कवडे, संदेश स्पोर्ट फाउंडेशचे संदेश बोर्डे, एमपीसी न्यूजचे कार्यकारी संपादक ऋषिकेश तपशाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार संपत निकम, कपिलेश इगवे, महिला पोलीस दिपाली शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.