‘शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे’

उद्धव ठाकरे यांना 'अल्टिमेटम'

0

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असावा असं आम्हाला वाटतं. भाजप-शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली पाहिजे. आमचे बंड उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नसून आमच्या पक्षाला संपवणार आहे त्यांच्या विरुद्ध आहे. हात जोडून विनंती करतो, आम्ही सगळं विसरुन जातो. जनतेने जो निर्णय घेतला त्याच्या बरोबर जाऊया, आजचा शेवटचा दिवस आहे, कितीवेळ आम्ही आवाहन करणार, शेवट गोड करा अशी विनंती शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

आमचा संयम तुटत चालला आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी बोलावे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे. कुठेतरी भाजप-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला, असं आवाहन केसरकर यांनी केले आहे.

दिपक केसरकर म्हणाले, ठाकरे कुटुंबाची  बदनामी होत असताना मी सगळ्यात आधी पुढे आलो. मला गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकार शिवसैनिकांना नाही. चांगल्या गोष्टी घडत नसतील तर त्याला जबाबदार त्या गोष्टी न घडवणारेही आहेत. आमच्यावरील टीका किती सहन करायची? 17 केसेस आमच्यावर आहे.

 

गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय राठोड यासारखे किती शिवसैनिक आहेत ज्यांनी सेनेसाठी संघर्ष भोगलाय. आमच्यावर गद्दारीचा शिक्का का मारतायेत. कुणीही तुमच्या संपर्कात नाही. तत्वांशी जोडले आहेत. एक आमदार पाच दिवसांचे फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल भरु शकत नाही. शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे,
असा अल्टिमेटम शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.