पिंपरी : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड कुठलीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. याप्रकरणीगुंडा विरोधी पथकाने कारवाई करत तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२६ जुलै) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारासथेरगाव येथे करण्यात आली.
आकाश रंगनाथ चव्हाण (२६ रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार रामभाऊ मोहिते यांनी हिंजवडीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी १५ सप्टेंबर२०२२ रोजी एक वर्षाकरिता पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीचा आदेश असताना देखील आरोपी हाथेरगाव परिसरात असल्याचे पोलिसांना खबर मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याला अटक केली असता त्याच्याकडे एकलोखंडी कोयता ही मिळून आला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.