पिंपरी कॅम्प येथील व्यापाऱ्यांची फसवणूक करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा : नगरसेवक हिरानंद (डब्बू) आसवानी

0

पिंपरी : पिंपरी कॅम्प येथील नेपाळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची फसवणूक करून व त्यांच्या वरती दमदाटी करून पैसे वसूल केलेल्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. अशी माहिती नगरसेवक डब्बू वासवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

त्यांनी यावेळी सांगितले की, पिंपरी कॅम्प येथील नेपाळी बाजारपेठेतील व्यापारी जवळजवळ अकरा ते बारा वर्ष झाले त्या ठिकाणी व्यापार करत आहे. तिथल्या व्यापाऱ्यांनी मिळवून त्यांची एक संघटना स्थापन केली आहे. व्यापारी संघटना व त्या संघटनेला एक अध्यक्ष निवडून दिला होता. सध्यास्थितीत (गुड्डू यादव) सदर व्यक्तीची निवड केली होती. पण सदर व्यक्तीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून गोरगरीब व्यापारांना खोटी कारणे सांगून विविध प्रकारच्या वर्गणी मधून दमदाटी करून पैसे वसूल केले आहेत.

संघटनेमधील अध्यक्ष व त्यांच्या काही सोबतच्या लोकांनी मिळून व्यापाऱ्यांवर ती दमदाटी करून व त्यांची फसवणूक करून आतापर्यंत ६० ते ७० लाखांचा गफला केला आहे. आज पर्यंत त्या गोरगरीब व्यापारांना दमदाटी करून हा प्रकार लपविण्यात आला होता पण काही धाडसी व्यापाऱ्यांनी या त्रासाला कंटाळून आसवानी यांच्याकडे तक्रार दिली. तसेच घडलेल्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्याची योग्य ती चौकशी करावी व संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना केली आहे.

तसेच या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मनपा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.