पिंपरी : ५ मार्च रोजी होणारी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया ही आवाजी मतदान ऐवजी गुप्त मतदानाद्वारे घ्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात काटे यांनी म्हटले आहे की , सत्ताधारी भाजपच्या गलिच्छ राजकारणाला त्याचेच नगरसेवक पुरते वैतागले आहेत . उद्या होणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार आहेत.
परंतु आवाजी मतदान प्रक्रियेमुळे ते धास्तावत आहेत , त्यामुळे गुप्त मतदान घेतले तर खात्रीशीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुमत मिळणार आहे. आणि हीच भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे.