Talk Maharashtra Impact : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात स्पा आणि वेश्या व्यवसाय जोरात सुरु असल्याने याबाबत सविस्तर वृत्त talkmaharashtra.com ने प्रसिद्ध केले. या वृत्ताची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली. पिंपरी परिसरात स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी छापा टाकला. एका महिलेची सुटका करुन एकाला अटक केली आहे. तर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) दुपारी पिंपरी मंडई येथे करण्यात आली.

अक्षय शरद भालेराव (23, रा. निगडी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल जाधव, वैशाली, वैभव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक जमीर तांबोळी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भाजी मंडई येथे सृष्टी स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

talkmaharashtra.com ने प्रसिद्ध ‘स्पा आणि वेश्या व्यवसाय’ शहराला लागलेली कीड असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेत कारवाई केली आहे. शहरात अश्या प्रकारचे अवैद्य प्रकार सुरु असून कारवाई नंतर काही दिवसात ते पुन्हा सुरु होतात.

Leave A Reply

Your email address will not be published.