काळेवाडीतील भेळच्या दुकानातून अडीज लाखाचे आमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

0

पिंपरी : राजस्थान येथून आणलेला आफु हा आमली पदार्थ दुकानात ठेऊन विक्री करणाऱ्या एकाला आमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल अडीज लाख रुपयांचा आमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई काळेवाडी येथे करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपुनछपुन होणारी अंमली पदार्थाची विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आमली पदार्थ विरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कार्यालयात हजर असताना पोलीस हवालदार प्रदिप शेलार यांना माहिती मिळाली.

मिळालेल्या माहीतीवरून थेरगाव येथील डी मार्ट जवळ असलेल्या कृष्णा भेळ नावाचे दुकानावर छापा मारून प्रकाश रामेश्वर अहिर (22, रा. गजानन काॅलनी, ज्योतीबा नगर, काळेवाडी, पुणे मुळ गाव खेडा ईरानी, ता. धुमला, जि. चित्तोडगढ,  राजस्थान) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याच्या दुकानातून दोन लाख 62 हजार 400 रुपये किंमतीचा 631 ग्रॅम वजनाचा अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला.

प्रकाश याचे वडील रामेश्वर शंकर अहिर यांनी राजस्थान येथुन अफीम ट्रकने पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे, पोलीस उपायुक्त , गुन्हे , डॉ काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार , सहायक निरीक्षक प्रशांत महाले व पोलीस अमंलदार बाळासाहेब सुर्यवशी , प्रदिप शेलार , राजेंद्र बांबळे , संदिप पाटील , मनोज राठोड ,अजित  कुटे, अनिता यादव , अशोक गारगोटे , पांडुरंग फुंदे ,नागेश माळी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.