तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR, CM उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्यात ‘चाय पे चर्चा’
देशात तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली सुरु
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (रविवार) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. सध्या के चंद्रशेखर राव हे तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत त्यांनी नुकतेच दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार केसीआर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या दोन प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चाच करणार आहोत, असं म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर केसीआर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
Mumbai: KCR meets Maharashtra CM Uddhav Thackeray to unite against BJP at national level
Read @ANI Story | https://t.co/83ocHFMayG pic.twitter.com/jqay4SpQ8h
— ANI Digital (@ani_digital) February 20, 2022
राव यांनी यापूर्वीच 20 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांची भेट घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादला येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. ममता बॅनर्जी यांनी मला फोन करुन बंगलमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. अथवा आपण हैदराबादला येऊ असे सांगीतले. त्यांनी मला डोसा खावू घाला, अशी विनंती केली. मी त्यांचे कधीही स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या लवकरच हैदराबदला येऊ शकतात.
You will get to see a good result of our meeting very soon. I invite Uddhav Ji to come to Telangana: Telangana CM K Chandrasekhar Rao after his meeting with Maharashtra CM Uddhav Thackery and other leaders, in Mumbai pic.twitter.com/VaDYb2UeQx
— ANI (@ANI) February 20, 2022
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने आपलं धोरण बदलायला पाहिजे. असे केले नाही तर पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहे.
Central agencies are being misused in a very bad manner, we condemn it. The central govt should change their policy, they’ll suffer if they don’t. The country has seen many such things: Telangana CM K Chandrashekar Rao, after meeting with Maharashtra CM Uddhav Thackeray in Mumbai pic.twitter.com/V5NpBjRhG7
— ANI (@ANI) February 20, 2022
2019 च्या निवडणुकीपूर्वी अनेक विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अनेक गोष्टी बदलल्यात. सध्याची परिस्थिती देशासाठी घातक सिद्ध होतेय. ती दिवसेंदिवस चिघळतेय. त्यामुळे तिसरी आघाडी उभारु.
त्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, परंतु या आघाडीचे नेतृत्व कोण करणार याचे ठोस उत्तर केसीआर यांनी दिले नाही.