तेलंगणा पोलिसांची पुणे शहरात मोठी कारवाई

0
पुणे : हैदराबाद आणि तेलंगणामध्ये ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांनी पुण्यात येऊन या रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका चिनी महिलेसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे.

तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 100 हून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्याची पाहणी केली असता. त्यांच्या खात्यात लाखो रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ऑनलाइन कर्ज देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरु असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तेलंगणा पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी कॉल सेंटरचा शोध घेतला. पोलिसांनी कोरेगाव पार्क पोलिसांच्या मदतीने शनिवारी कॉल सेंटरवर छापा टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.