पिंपरी: पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे–नाशिक महामार्गावर ट्रकनेएका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशीमाहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अपघातीलमृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही म्हटले आहे.
“पुणे–नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणाव्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्याउपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.