अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणाऱ्या दहशतवाद्याला अटक

0

पुणे : पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 28 वर्षे  वयाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. पुण्याच्या दापोडी परिसरातुन त्याला अटक करण्यात आली आहे.

जुनेद मोहम्मद (28) असे अटकेत असलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. त्याला 3 जून प्रयत्न पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. मागील दीड वर्षांपासून तो दापोडी परिसरातील एका मदरशाजवळ भाड्याच्या घरात राहतो. या परिसरातील काही स्थानिक तरुणांच्या तो संपर्कात होता. जम्मूतील उमर आणि आफताब शहा या दोन व्यक्तींच्या तो संपर्कात होता. या दोघांनी त्याच्या बँक खात्यावर काही पैसे पाठवण्याची देखील निष्पन्न झाले आहे.  अतिरेकी कारवाया करण्यासाठी ते पैसे पाठवल्याचे समोर आले आहे.

अतिरेकी कारवायांसाठी तरुण मुलांची भरती करणे आणि त्यांना दारूगोळा आणि शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याला फंडिंग केले जात असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे दापोडीतील ज्या परिसरात तो राहत होता तेथील काही स्थानिक तरुणांच्या संपर्कात होता. स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यासाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्यापूर्वीच दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.