शोपियानमध्ये दहशतवादी-लष्करांत पुन्हा चकमक; 3 दहशतवादी ठार

0

जम्मू : शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहितीये.

या चकमकीत लष्कर या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवली जात असल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं. शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा दलाच्या पथकानं तपास मोहीम सुरू केली. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम तीव्र केलीये.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील वाथू शिरमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. यावेळी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.