उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) सहारनपूर येथून मोहंमद नदीम याला अटक केली आहे. तो जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे.
एटीएसच्या चौकशीत त्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या हत्येच्या कटाची माहिती दिली. नदीम यूपीमधील सहारनपूरचाच रहिवासी आहे. आझमगड येथून अटक करण्यात आलेल्या सबाउद्दीन आझमीकडून मिळालेल्या माहितीनंतर नदीमला अटक करण्यात आली. एटीएसने सांगितले की, नदीमकडे अनेक आयडी कार्ड, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि संशयित पुस्तके मिळाली आहेत.