ओटास्किम परिसरात दहशत माजविणाऱ्यांची काढली ‘धिंड’

0

पिंपरी : निगडी, ओटास्कीम ‘परिसरावर वर्चस्व कुणाचे’ या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुस-या गुन्हेगारावर गोळीबार केला. यातील आरोपींना निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) तपासानिमित्त घटनास्थळी पायी फिरवत धिंड काढली.

दोडमणी आणि खवले यांच्यात परिसरात वर्चस्व कुणाचे यावरून वाद सुरु होता. या वादातून किरण खवले या सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला. या गोळीबारात आकाश दोडमणी याच्या पायावर गोळी लागून तो जखमी झाला होता. तसेच, दोडमणी याचा भाऊ देखील जखमी झाला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, गुन्हे शाखा व खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीसुद्धा घटना स्थळी भेट दिली होती. दरम्यान, या प्रकरणातील अटक केलेल्या चार आरोपींना आज (शनिवारी) निगडी पोलिसांनी घटनास्थळी पायी फिरवले. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले होते. गुन्हा कसा घडल , हत्यारे कुठे ठेवली आहेत, याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.