टीईटी घोटाळा : पैशाचं वाटप पुणे पोलिसांच्या तपासात उघड

0

पुणे : महराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणातील पैश्यांचे वाटप समोर आले आहे. डॉ.प्रीतिशदेशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून अश्विनकुमार शिवकुमार याला 5 कोटी 37 लाख रुपये देण्यात आल्याचेपोलीस तपासात उघड झालं आहे. तर, या पाच कोटी रुपयांपैकी 2 कोटी रुपये जीएस सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याला देण्यातआलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या तुकाराम सुपे आणि सुखदेव डेरे यांना देखील पैसेदेण्यात आल्याचं समोर आलंय.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून तेअश्विनीकुमार याला देण्यात आले.

अश्विनकुमार याने टीईटी 2018 मधील 600 ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोनकोटी जी..सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला दिले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे याला 20 लाखरुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास 30 लाख रुपये दिले होते.

टीईटी परीक्षेमध्ये परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणारा जी सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनीकुमार याने संस्थापक गणेशनयाला तब्बल 2 कोटी रुपये दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.