मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल झाली होती. मात्र आता तक्रार करणाऱ्या गायक महिलेनेच यू-टर्न घेत आपली तक्रार मागे घेतली आहे. यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.
“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली आहे. 15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.