पुणे : अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याचीहत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
भरत शेखा गायकवाड (57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्यादीपक गायकवाड (३५) यांची हत्या झाली आहे.
अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी सुट्टीवर आले होते. मध्यरात्री सव्वातिनच्या सुमारास त्यांनी गोळी झाडून हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खासगी पिस्तूलातूनगोळ्या झाडल्या आहेत.
दरम्यान त्यांनी हत्या आणि आत्महत्या का केली हे मात्र समजले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील बाणेर भागात तेराहत होते.