1 जून पासून या बँकेने व्यवहारात केले काही बदल

0

नवी दिल्ली : जर तुम्ही बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या बँकांच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. बँक ऑफ बडोदाने चेकद्वारे केलेल्या पेमेंटशी संबंधित असलेल्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत, तर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेने आयएफएससी कोडच्या आवश्यकते संबंधित काही बदल केले असल्याचे समजते आहे.

बँक ऑफ बडोदाचे चेक पेमेंट बदलले…
1 जून 2021 पासून बँक ऑफ बडोदाने चेकद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेन्टमध्ये होणाऱ्या फसवणूकीच्या घटना रोखण्यासाठी ग्राहकांना ‘पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन’ अनिवार्य करणार आहे.

‘ग्राहकांना विनंती आहे की लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या चेकची पुर्व सूचना आम्हाला द्यावी, जेणेकरुन सीटीएस क्लीयरिंगच्या वेळी बँक ग्राहकांशी संपर्क न साधता हाय-व्हॅल्यू चेक पास करू शकेल.’ असे बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच फक्त 2 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या व्यवहारासाठीच ग्राहकांना चेक तपशिलाचे पुष्टीकरण करणे आवश्यक असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

1 जुलै 2021 रोजी त्यांच्या शाखांचे आयएफएससी कोड बदलतील, अशी माहिती कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना दिली आहे. तर सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना 30 जून 2021 पर्यंत बदललेले आयएफएससी कोड बँकेच्या शाखेतर्फे सांगण्यात येतील. यासाठी या ग्राहकांना बँकेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल आणि बदललेले आयएफएससी कोड पहावे लागतील.
दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिंडीकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. त्याच वर्षी चांगल्या सेवा आणि सुविधा देण्यासाठी बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक, विजया बँकेने आणि आणखी एका मोठी बँकेचे विलीनीकरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.