मुंबई ः सोमवारपासून (१४ डिसेंबर) मुंबईत विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनास सुरूवात होणार आहे. त्यामुळे विरोध पक्ष भाजपाला सरकारला घेरण्याची संधी कमी असेल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास दुणावलेला आहे, त्यामुळे सरकार अधिवेशनाची औपचारिकता लवकर पूर्ण करेल.
केवळ दोन दिवसांच्या या अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडले जातील, तसेच दिवंगत सदस्यांनी श्रद्धांजली वाहूनन या अधिवेशानाचे कामकाज बंद संपेल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीला मिळालेले यश, करोनावर मिळविलेले नियंत्रण आणि सरकारने पूर्ण केलेले एक वर्ष या जमेच्या या जमेच्या बाजू असल्याने, यातून सरकारममधील मित्रपक्षांची एकी दिसलेली एकी अधिवेशनातही दिसेल.
करोनामुळे विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकले नाही. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनही करोनामुळे लवकर बंद करावे लागले. पावसाळी अधिवशनही लांबले. करोनामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याचा मिळाला, अशा पुन्हा अधिवेशन ७ डिसेंबरवरून आता १४-१५ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले आहे.