चिंचवड मधील तरुणाचा मृतदेह आढळला मुळशीत

0
पुणे : मुळशी खुर्द ( ता.मुळशी ) येथे हाँटेल दिशाजच्या जवळ एकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा नक्की काय प्रकार आहे हे अद्याप समजू शकले नाही.

विजय सर्जेराव सुर्वे (४०, रा. चिंचवड ) या तरूणाचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या येथील नागरिकांना प्रथम दारू पिऊन रस्त्याच्या कडेला कोणी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. माञ हि पडलेली व्यक्ती पालथी पडलेली असून अंगातून रक्तस्त्राव येत होता. असे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली. सुर्वे हे शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख आहेत. हा प्रकार pअसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

या घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली तसेच या बेवारस मृतदेहाची माहिती घेतल्यानंतर तो चिंचवड येथील विजय सुर्वे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड, पोलिस हवालदार शंकर नवले, बीट अमंलदार सचिन शिंदे,ठाणे अमंलदार अनिता रावळेकर, पोलिस नाईक चंद्रशेखर हगवणे,पोलिस पाटील आकाश कांबळे यांनी घटना स्थळावर धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.