चादरीत गुंडाळून मृतदेह आणून ठेवला भर चौकात

पुण्याच्या मगरपट्टा परिसरातील धक्कादायक घटना

0
पुणे : पुण्याचा हडपसर परिसरातून शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर अज्ञात व्यक्तीने टेम्पोतून चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आणून टाकला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर येथून नारायण व्यास आणि त्याचे दोन साथीदार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की,शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर एक टेम्पो आला. या टेम्पोतून खाली उतरलेल्या दोन व्यक्तींनी चादरीत गुंडाळलेला एक मृतदेह टेम्पोतून बाहेर काढला आणि उद्यानासमोर तो मृतदेह टाकून देत त्यांनी पळ काढला.
दरम्यान याठिकाणी जमा झालेल्या नागरिकांना या चादरीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आणि ससून रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. यातील मयताची ओळख पटवली असता त्याचे नाव संतोष असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. नारायण व्यास याचा केटरिंगचा व्यवसाय असून लोणीकाळभोर परिसरात राहावयास आहे.
गुरुवारी हडपसर येथील मजूर अड्डा येथून त्याने संतोष याला केटरिंगसाठी नेले.दिवसभर काम करून तो कामगारांच्या खोलीत झोपला असता झोपेतच तो मयत झाला. पहाटे त्यास उठवण्यासाठी गेला असता तो मयत आढळून आल्याने त्यास व्यास यांनी दोन साथीदारांना बोलावून घेत छोटा टेम्पोत चादर मध्ये गुंडाळून टाकले. सदर मृतदेह त्यांनी मगरपट्टा सिटी परिसरात लोहियानागर येथे फुटपाथवर टाकून देत पळ काढला. याबाबत पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.