केरळ : दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली तरुणी आपल्या प्रियकरासोबत एका खोलीत सापडली. विशेष म्हणजे ही तरुणी गेली दहा वर्षे प्रियकरासोबत एकाच खोलीत राहत होती. हैराण करणारी बाब म्हणजे दोघांच्या कुटुंबीयांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती.
पोलिसांनी सांगितलं की, 2010 मध्ये तरुणी बेपत्ता झाली होती. त्यावेळी ती अवघ्या 18 वर्षांची होती. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितलं की, तरुणीचं घर प्रियकराच्या घराजवळच होतं, आणि ती मार्चपर्यंत त्या तरुणासोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराक्टुपारम्ब गावात एकाच खोलीत राहणाऱ्या तरुणीची देखभाल तिचा प्रियकर करीत होता.
तरुणी रात्रीच्या वेळी खोलीच्या खिडकीतून बाहेर निघत होती, जे दार दिवसभर बंद होतं. या खोलीला टॉयलेट कनेक्टेड नव्हतं. तिचा प्रियकर खाण्याच्या पदार्थांसोबत अन्य आवश्यक गोष्टी तिला देऊन जात असे. आणि बाहेरुन खोली बंद करून घेत होता. प्रियकरदेखील तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या तपासादरम्यान या कहाणीचा खुलासा झाला.
मंगळवारी या व्यक्तीच्या भावाने दोघांचा तपास केला. हे दोघे नेमाराजवळील विथानासेरी गावात भाड्याने राहत होते. पोलिसांनी सांगितलं की, या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, तेव्हा तरुणीने प्रियकरासोबत राहत असल्याचा खुलासा दिला. यावेळी न्यायालयानेही दोघांना एकत्र राहण्याची परवानगी दिली.
यावेळी नातेवाईकांनीही याचा विरोध केला नाही. पोलिसांनी सांगितलं की, गेल्या 10 वर्षांपासून ते कराक्टुपारम्बमध्ये एका व्यक्तीच्या घरात राहत होती आणि इतक्या वर्षांपासून आपल्या प्रेयसीला लपून ठेवण्यात यशस्वी झाला होता. त्याच्या बहिणीलाही याबाबत कळालं नाही.