‘मॅट’चा दणका; प्रदिप जांभळेंची अतिरिक्त आयुक्तपद नियुक्ती रद्द, झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) दणका दिलाआहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती रद्द केली. महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांना आजपासून दोनआठवड्यात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश मॅटने राज्य सरकारला दिले आहेत.

महापालिकेत उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करुन घेतले नाही. त्यानंतर राज्य शासनाने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडेयांची नियुक्ती रद्द करुन प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली.

दुसयाच दिवशी जांभळे पालिकेत रुजू झाले. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीलामॅटमध्ये आव्हान दिले होते. झगडे यांनीराज्य सरकार, प्रदीप जांभळे आणि महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी केले होते.

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)चे सदस्य .पी. कुहेकर यांच्या खंडपीठापुढे त्याबाबत सुनावण्या झाल्या. 14 फेब्रुवारीपासून सलगतीनदिवस सुनावणी झाली. स्मिता झगडे यांच्या वतीने अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी युक्तीवाद केला.

त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली. उपायुक्त स्मिता झगडे यांनाआजपासून दोन आठवड्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश .पी. कुहेकर यांनी राज्य शासनालादिले आहेत. दरम्यान, या निर्णया विरोधात प्रदिप जांभळे उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.