पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या बसने एका दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यात दुचाकीस्वारगंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजता गणेश मंदिराच्या विरुद्धबाजूला थेरगाव येथे घडली.
अशोक लक्ष्मण सोनवणे (वय 48) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अशोक यांचे भाऊ शंकर लक्ष्मण सोनवणे(वय 51, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक अनोळखी व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक सोनवणे हे त्यांच्या दुचाकीवरून थेरगाव येथून जात होते. गणेश मंदिराच्या समोरून यु टर्नघेऊन डांगे चौकाकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या बसने (एमएच 46/जे0029) अशोक यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकदिल्यानंतर बस चालकाने अशोक यांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला, कमरेला आणि इतर ठिकाणी गंभीरदुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुसकान झाले आहे. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती नदेता आरोपी बस चालक घटनास्थळावरून निघून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.