‘गॅस एजन्सी’च्या आड सुरु होता आमली पदार्थ विक्रीचा धंदा
१८ लाख ५९ हजार रुपयांचे 'पॉपी स्ट्रॉ' आमली पदार्थ, बेकायदेशीर पिस्टल, काडतुसे जप्त
पिंपरी : राजस्थान येथुन पिंपरी चिंचवड परीसरात मोठया प्रमाणात अफूची बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) हा अंमली पदार्थ आणून गॅस एजन्सीच्या आड विक्री करणारे आतरराज्य विष्णोई टोळीचा गुन्हे शाखेच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफार्स केला आहे. विशेष म्हणजे यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल , तीन जिवंत काडतुसह, ११० किलो पॉपी स्ट्रॉ व अफिम जप्त केले आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपुन छपुन होणारी अंमली पदार्थाची विकी , साठवणुक व वाहतुकीस पूर्णपणे प्रतिबंध व्हावा याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार तपासणी करत आहेत. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढणे व रेकॉर्ड वरील आरोपी चेक करण्याकरिता वाकड , हिंजवडी पोलिस स्टेशन चे हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरु होईतो .
आमली पदार्थ विरोधी पथकाचे दोन्ही पथके पेट्रालिंग करीत असतांना पोलिस अंमलदार प्रदीप शेलार व संदीप पाटील यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. सांगावडे गावाच्या हद्दीमध्ये एक इसम हा नशा करण्याकरीता लागणाऱ्या अफूचे बोंडाचा डूडा चरा ( पॉपी स्ट्रॉ ) बाळगुण त्याची विक्री करीत आहे . मिळालेल्या माहितीनुसार जांभे , सांगवडे गावाच्या हद्दीत छापा मारला असता सदर ठिकाणी एक पिवळे रंगाचा भारत गॅस टेम्पोचे ड्रायव्हर सीटवर व मोकाशी हाईटचे टेरेसवरील रुममध्ये १८ लाख ५९ हजार ४९५ रुपये किंमतीचा ११० किलो अफूचे बोंडाचा डूडा चुरा ( पॉपी स्ट्रॉ ) , ५६ ग्रॅम अफिम व एक देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुस आढळून आली.
पोलिसांनी जयप्रकाश साईराम खीचड (२४, रा. तिसरा मजला मोकाशी हाईट सांगवडे , ता . मावळ जि . पुणे), महेश कुमार उर्फ श्याम बाखाराम बिष्णोई, विकास मोहनराम बिष्णोई, पप्पू उर्फ भगवानराम खमुराम बिष्णोई, सुरेशकुमार जगलागाराम सियाक बिष्णोई (दोघे रा . मोकाशी हाईट सांगवडे , ता . मावळ जि . पुणे मुळ रा . जोधपुर राज्यस्थान), महिपाल जंगलानाराम सियाक बिष्णोई, विकास डाका बिष्णोई (रा . मोकाशी हाईट सांगवडे , ता . मावळ जि . पुणे मुळ रा जोधपुर राज्यस्थान) यांच्यावर कारवाई केली आहे. याचे मदतीने पिंपरी चिंचवड परीसरात विक्री करीत होते .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उपायुक्त , गुन्हे , डॉ काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार , सपोनि श्री प्रशांत महाले , पोउपनि श्री राजन महाडीक व पोलीस अमलदार बाळासाहेब सुर्यवंशी , प्रदिप शेलार , दिनकर भुजबळ , संदिप पाटील मयुर वाडकर , संतोष भालेराव , मनोज राठोड , प्रसाद कलाटे , दादा घस , अशोक गारगोटे यांनी केली आहे .