कार स्लिप होऊन दरीत कोसळली; तीन जणांचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

0

पुणे : कार स्लिप होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

ऋषभ किशोर चव्हाण (24), कृष्णा पंडित राठोड (27) व सौरभ श्रीकांत भिंगे (25 सर्व रा. मंगळूरपीर जि वाशीम) या तिघा युवकांचा  अपघातात मृत्यू झाला आहे. रोहन परशुराम गाडे (26), प्रवीण गजानन सरकटे (26), रोहन किशोर चव्हाण (22 वर्ष, सर्व रा. मंगळूरपीर जि वाशीम) या तिघा युवकांना वाचवण्यात यश आले आहे.

पाटील म्हणाले की पाच युवक हे ड्राइव्हर रोहन परशुराम गाडे (26) सोबत स्विफ्ट गाडी क्र (MH 12 HZ 5535) मधून पुण्यावरून देवकुंड येथे वर्षाविहारासाठी शनिवारी 20 ऑगस्ट जात होते. देवकुंड हे तेथील धबधब्यामुळे व नयनरम्य निसर्गामुळे कोकणातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे जवळच्या पुणे जिल्ह्यातून व इतर ठिकाणवरून पर्यटक येथे वर्षाविहारासाठी येत असतात.

काल दुपारी 4.30 वा ते कोंडेथर गावाच्या हद्दीतील एका डोंगर माथ्यावर फोटो काढण्यासाठी कार मध्ये पोहोचले असताना ड्राइव्हर ने ब्रेक मारला पण तेथील जागा पावसामुळे निसरडी झाल्याने कार न थांबता पुढे गेली व खाली सुमारे 500 फूट खोल दरीत पडली.

पण मागे बसलेल्या तीन युवक हे गाडी ला ब्रेक मारण्या पूर्वी त्यांनी दरवाजा उघडला व त्यामुळे जेव्हा कार खाली दरीत पडत असताना ते तिघे बाहेर फेकले गेले. सुदैवाने 100 फट खोलावर असलेल्या सपाट जमिनीवर पडले व जखमी झाले.

कारचे पुढचे दरवाजे बंद असल्याने पुढील तीन जणांना काही कळण्यापूर्वी कार दरीत कोसळली व त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांना या अपघाताबाद्दल कळल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर आजूबाजूच्या रेस्कु टीम्सला बचाव कार्य करण्यासाठी बोलावण्यात आले.

बचाव कार्यातील अडचणींविषयी, पाटील म्हणाले की, “अतिशय वाईट भर पावसात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.  खूप भयानक परिस्थितीत काम चालू आहे. गाडी कमीत कमी पाचशे फूट दरीत जाऊन पडली आहे. सदर रेस्क्यू ऑपरेशन मध्ये एस आर टी टीम माणगाव, महाड शेलार मामा रेस्क्यू टीम, पाटणूस गरुडमाची येथील रेस्क्यू टीम यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलेल आहे.”

जखमींच्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, “तीन जन कार मध्ये मागे बसले असल्याने कार दरीत कोसळत असताने ते बाहेर फेकले गेले होते. ते 100 fut खाली असलेल्या सपाट जमिनीवर पडून जखमी झाले होते. त्या तिघांना 7 ते 7.30 तास रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविले आहे. ते तिन्ही जखमी साक्षीदार माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असून त्यांची तब्येत स्थिर आहे. चिंताजनक काही नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.