पूजा चव्हाण हिच्या मृत्यूचे कारण झाले स्पष्ट

0
मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्यावर व मनक्याला मार लागल्याने झाला असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. तसेच या आत्महत्या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे.

अशातच पूजा चव्हाण हिचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यानुसार पूजाच्या डोक्यावर व मनक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन इमारतीवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्यावर व मनक्याला मार लागला व त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात होता की आत्महत्या की आणखी काही ..याबाबत अद्याप नेमका खुलासा झालेला नाही.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली असून पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस देण्यात आली आहे. महिला आयोगाने पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची केली मागणी केली आहे.  महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पुजा चव्हाणच्या आत्महत्येची दखल घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.