मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

0

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिष्टमंडळासह आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व मुख्य सचिव सीताराम कुंटे हे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते  वादळग्रस्तांना नुकसानभरपाई, जीएसटी भरपाईची थकबाकी या विषयांवर ते पंतप्रधानांशी चर्चा करतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षां निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण व इतर विषयांबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

मा मुख्यमंत्री महोदय यांचे मंगळवार 8 जून 2021 रोजीचे कार्यक्रम

सकाळी 7 वाजता: विमानाने दिल्लीकडे प्रयान

सकाळी 9.45 वाजता महाराष्ट्र सदन येथे आगमन

सकाळी 11 वाजता : मा पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत बैठक

स्थळ: प्रधानमंत्री निवास, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली

बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण

Leave A Reply

Your email address will not be published.