पुणे : महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. आज पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे.
पुण्यातील शिरूर याठिकाणी आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच हवेली आणि पाषण या दोन्ही ठिकाणचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. दुसरीकडे विदर्भात देखील गारठा वाढला असून नागपुरातील वातावरण 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.