पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणाऱ्या पायलटला कंपनीने काढले 

0

नवी दिल्ली ः “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत”, असा आशयाचे ट्विट करणाऱ्या पायलटला गोएअर हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने तडकाफडकी काढून टाकले आहे, ही माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

मिकी मलिक असे या पालटाचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. या ट्विटवर अनेकांनी आक्षेप आपला निषेध नोंदविला आणि वाद निर्माण झाल्यावर मलिक यांनी आपलं हे ट्विट डिलीट केलं आणि माफही मागितली, त्याचबरोबर ट्विटर अकाउंट लाॅक करून टाकलं.

अनेकांनी निषेध नोंदविल्यावर मलिका यांनी “पंतप्रधानांबद्दल आणि इतर काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल मी माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही”, असे ट्विट करून माफीही मागितली होती.

गोएअर कंपनीने सांगितले की, “एअरची अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारण आहे. गोएअरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचं, कायद्यांचं आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचं पालन करणे बंधनकारक आहे”, अशी प्रतिक्रिया कारवाई केल्यानंतर प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.