देशात २४ तास टोचली जाणार कोरोना लस

0

नवी दिल्ली : देशात १ मार्चपासून देशभरातील ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील नागरिक दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशभरात आतापर्यंत १.५४ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या आकडेवारीमध्ये मंगळवारी देण्यात आलेल्या सहा लाख ९ हजार ८४५ लसींचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीमध्ये ही माहिती दिली आहे.

कोविड-१९ विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि २ फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुरुवात झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.