जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खुला होऊ लागेल देश

0

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गात वेगाने होत असलेली घसरण आणि बरे होणार्‍या रूग्णांची वाढती संख्या पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची आशा वाढली आहे. यामुळे आर्थिक हालचाली सुरू होतील. मात्र आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने लॉकडाऊन हटवण्यात सध्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. म्हटले की, पॉझिटिव्हिटी दर ठरलेल्या मापदंडाच्या कक्षेत आला तरी त्यावर लक्ष ठेवावे लागेल की, संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात होऊ नये.

आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, जिथे संसर्ग दर 10 टक्केपेक्षा खाली आहे आणि तो सतत कमी होण्याच्या मार्गावर असेल तर हालचाली सुरू झाल्या पाहिजेत. अशा जिल्ह्यांची संख्या वाढली आहे आणि हा संकेत आहे की, देश दुसर्‍या लाटेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. मागील तीन आठवड्यापासून आकडे याचा पुरावा देत आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगढ, बिहारसारख्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर पाच टक्केपेक्षा कमी किंवा त्याच्या जवळपास आला आहे. या राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा दर आणि नवीन प्रकरणांची संख्या मार्चच्या अंतिम आठवड्याच्या स्तरावर पोहचली आहे, जेव्हा कोणताही लॉकडाऊन नव्हता. बहुतांश राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय 15 एप्रिलच्या जवळपास घेतला होता, तेव्हा अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट 36-37 टक्केपर्यंत पोहचला होता.

लॉकडाऊन हटवल्यानंतर संसर्ग वाढण्याची शक्यता
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त करत वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, पॉझिटिव्हीटी दर कमी होऊनही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय दोन कारणांमुळे घेण्यात आला. एक तर लॉकडाऊन उघडण्याच्या तात्काळ नंतर पॉझिटिव्हीटी रेट वाढू शकतो. दुसरे, सध्याच्या सक्रिय रूग्णांची संख्या अजूनही खुप जास्त आहे.

अशावेळी त्या राज्यांना जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे जिथे पॉझिटिव्हीटी दर कमी असूनही सक्रिय प्रकरणांची संख्या खुप जास्त आहे. लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय वेगवेगळी राज्य आपली आरोग्य संरचना, पॉझिटिव्हीटी दर आणि सक्रिय प्रकरणांच्या आधारावर घेतील. लक्ष देण्याची बाब ही आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्थानिक स्तरावर लॉकडाऊनसाठी पॉझिटिव्हीटी दर 10 टक्केपेक्षा जास्त असणे आणि ऑक्सीजन आणि आयसीयू बेड्स 60 टक्के भरण्याचा मापदंड ठेवला आहे. पॉझिटिव्हीटी दराचा मापदंड तर बहुतांश राज्य पूर्ण करत आहेत. एक आठवड्यात आयसीयू आणि ऑक्सीजन बेड्सची उपलब्धता सुद्धा खुप वाढेल.

Leave A Reply

Your email address will not be published.