शहरातील धोका वाढतोय… 24 तासात 834 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

0

पिंपरी : शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे आज शहराच्या विविध भागातील 812 आणि महापालिका हद्दीबाहेरील 22 अशा 834 नवीन रुग्णांची आज(गुरूवारी) नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

निगडीतील 82 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 53 वर्षीय पुरुष, भोसरीतील 49 वर्षीय पुरुष, हिंजवडीतील 74 वर्षीय पुरुष आणि पुण्यातील 72 वर्षीय महिला रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 11 हजार 515  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 3890 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1866 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 787 अशा 2653 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1281 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1332 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 51 हजार 870 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3577 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

pne
Leave A Reply

Your email address will not be published.