सोळू येथील घटनेत मृत्यूंचा आकडा तीन वर

19 जखमी; जखमींमध्ये तीन, चार वर्षांच्या बालकांचा समावेश

0

पिंपरी : आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी भीषण स्फोटझालाया स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेतकाही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तरकाहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रामचंद्र मारुती निंबाळकर (81), संतोष त्रंबक माने (दोघे रासोळू), नवनाथ पांचाळ (55) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेततरबेबीताई ठाकूर (70), नंदा संतोष शेळके (35), रणवीर विलास गावडे (3),.चंद्रकांत बबन निंबाळकर (70), मोनू गौतम (25), दिनेशरामकिसन मौर्य (20), दीपक सदाशिव ठाकूर (47), गणेश रामचंद्र कोटंबे (36), श्रुती सोमनाथ ठाकूर (4), विठ्ठल भाऊ ठाकूर (70), निवृत्ती लक्ष्मण ठाकूर (65), मनीषा बबन फुलशेटे (37), बसवराज बनसोडे (40), नागेश दिलीप ठाकूर (30), उमेश दिलीप ठाकूर(26), शिवांश नागेश ठाकूर (4), अमेंद्र रामविजय पासवान (23), रणजीत हरिश्चंद्र पासवान (19, सर्व रासोळू), अब्दुल कलाम खान(50, राचिखलीअशी जखमींची नावे आहेत.

गुरुवारी सायंकाळी कंपनीत भीषण स्फोट झालाया स्फोटाची दाहकता खूप असल्याने आजूबाजूच्या घरांना देखील तडे गेलेकाहीघरांचे मोठे नुकसान झाले आहेकंपनीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात बांधलेली जनावरे देखील भाजली गेली आहेततसेचजनावरांच्या गवताला देखील आग लागली.

सुमारे नऊ दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहेदरम्यानहा स्फोट विद्युत रोहीत्रामुळे झाला असल्याचेसांगण्यात आलेमात्र रोहित्र सुस्थितीत असून त्यातून होणारा विजपुरवठा बंद होतातसेच स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावरबदल्याने रोहीत्राचे खांब वाकले गेलेहा स्फोट रोहीत्रामुळे झाला नसल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले.

स्फोट झालेल्या कंपनीत एल्युमिनियम प्लेट बनवल्या जात होत्यामात्र मागील चार वर्षांपासून कंपनी बंद असल्याचे सांगितले जातआहेत्यामुळे हा स्फोट कशामुळे झालायाचे कारण अद्याप समजू शकले नाहीघटनेत बाधित झालेल्या घरांचे पंचनामे तहसीलकार्यालयाकडून केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.