पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील ‘कट-ऑफ’मध्ये अवघ्या काही गुणांचा फरक 

0

पुणे : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या गुणवत्ता यादीतील कट-ऑफमध्ये केवळ काही गुणांचा (पॉईट) फरक असल्याचे निदर्शनास येत आहे. नामाकिंत महाविद्यालयांमधील पहिल्या आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीतील कट ऑफ अवघ्या काही ‘पॉईट’ने कमी झाल्याचे दिसून आले.

अकरावी प्रवेश प्रक्रियेतंर्गत यंदा पहिल्या यादीपासूनच कट ऑफमध्ये सरासरी तब्बल चार ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ असल्याचे दिसून येते. हेच चित्र दुसऱ्या फेरीतही कायम होते.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसह सीबीएसई, आयसीएसई अशा विविध मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात एकूणच यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशाचा कट-ऑफ वाढणार हे यापुर्वीच स्पष्ट झाले होते. यंदा कट-ऑफ वाढल्यामुळे नामाकिंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमधील चुरस दुसऱ्या फेरीतही कायम असल्याचे चित्र आहे.

पहिल्या-दुसऱ्या फेरीतील चित्र : फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेचा पहिल्या फेरीत कट ऑफ ९७.४ टक्के इतका, तर दुसऱ्या फेरीत ९६.४० टक्के इतका आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील प्रवेशाचा पहिल्या फेरीत ९२.६० टक्के कट ऑफ होता, तर दुसऱ्या फेरीत तो केवळ काही पॉईंटने कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. या फेरीत वाणिज्य शाखेचा कट ऑफ ९२.४० टक्के इतका आहे. सिंबायोसिस महाविद्यालयाचा पहिल्या फेरीत कला शाखेचा कट ऑफ ९६.६० टक्के, तर वाणिज्य शाखेचा कट ऑफ ९४.०२ टक्के आहे. दुसऱ्या फेरीत कट ऑफ काही पॉईंटने कमी झाल्याचे दिसून येते. या महाविद्यालयात दुसऱ्या फेरीत कला शाखेचा ९६.२० टक्के तर वाणिज्य शाखेचा ९३.४० टक्के इतका कट ऑफ आहे.

शहरातील नामाकिंत महाविद्यालयाचा दुसऱ्या फेरीतील कट-ऑफ (टक्केवारीत) :

महाविद्यालयाचे नाव : शाखा : कट-ऑफ (टक्केवारीत) 

फर्ग्युसन महाविद्यालय : विज्ञान : ९६.४० टक्के
सिंबायोसिस महाविद्यालय : कला : ९६.२० टक्के
सिंबायोसिस महाविद्यालय : वाणिज्य : ९३.४० टक्के
आबासाहेब गरवारे महाविद्यालय : कला : ६७.२० टक्के
आबासाहेब गरवारे महाविद्यालय : वाणिज्य : ९३.८० टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : कला : ८३ टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : वाणिज्य : ९२.४० टक्के
सर परशुरामभाऊ महाविद्यालय : विज्ञान : ९३.२० टक्के
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : कला : ९३.४० टक्के
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : ८८.४० टक्के
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : ९४ टक्के
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : कला : ६६.२० टक्के
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : वाणिज्य : ८७.८० टक्के
मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर : विज्ञान : ९२.४० टक्के
नेस वाडिया महाविद्यालय : वाणिज्य : ७२.२० टक्के
सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य : ८२.८० टक्के
सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान : ९२.६० टक्के

Leave A Reply

Your email address will not be published.