संस्था संचालकाचे अपहरण करून डांबून ठेवले, चाकूचा धाक दाखवत राजीनाम्यासाठी दबाव

0
पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजीनामा द्यावा यासाठी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यांना सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर डांबून ठेवले. इतकेच नाही तर त्यांच्या गळ्याला चाकू लावून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला गेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तानाजी भोईटे, वीरेंद्र भोईटे आणि निलेश भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे वकील आहेत. ते जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे संचालक आहेत. आरोपींनी त्यांना पुण्यामध्ये संस्थेचे कागदपत्र देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून सदाशिव पेठेत असणाऱ्या एका फ्लॅटवर हात-पाय बांधून त्यांना डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत गळ्याला चाकु लावुन राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला.
विजय पाटील यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनाही आरोपींनी डांबून ठेवले होते. तसेच संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणली नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी घेतली. आरोपी चौरस थांबले नाही तर त्यांनी जळगाव येथील संस्थेत जाऊन तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.