शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला : अंबादास दानवे

0

मुंबई : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने आज परवानगी दिली. त्यानंतर आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रीया येत असून ​​​​​​ भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती दिवस रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील. शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला तर काड्या करणाऱ्या बंडखोरांना चपराक मिळाली असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेना 1966 पासून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत आहे. तिथेच मेळावा घेण्याबाबत ठरले. त्याबाबत सतत बैठका होत राहील्या. दसरा मेळावा होऊ नये म्हणून काड्या करण्याचे काम केले जात आहे. जे बंड करणारे लोक आहेत त्यांना मी म्हणेल की, आता बस झाले. त्यांना न्यायालयाने चपराक दिला. मी न्यायपालिकेला धन्यवाद देईल.

शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, आमचा न्यायदेवतेवरील विश्वासाची दृढता वाढवणारा आजचा निकाल आहे. भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला किती रोखणार? शेवटी शिवसेना ही सामन्य माणसांची संघटना आहे. जे -जे रोखेल ते संपतील. शिंदे गटाचा संपण्याचा काळ जवळ आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालाबाबत मी मत व्यक्त करणार नाही.

महाराष्ट्रात आधी जे घडत नव्हते ते आता घडत आहेत. उद्धव ठाकरे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत घेऊन निर्णय घेतले जातात असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, एक महिना शिवसैनिक धास्तावलेले होते. दसरा मेळाव्याचा संस्कार मोडीत काढण्यासाठी जे काम करीत होते त्यांना लोक मोडीत काढतील. कुठल्याही आयुक्तांनी दबावात काम करू नये. पालिका आयुक्तांनी सर्व निर्णय टाॅस केला. हा निर्णय विधी खात्याकडे पाठवला, त्यांनीही निर्णय दिला नाही. त्यामुळे पर्यायच नसल्याने आम्ही हायकोर्टाचे दार ठोठावले. शिंदे गट सुप्रीम कोर्टात जात असेल तर त्यांनी जावे. आमचा संविधानावर विश्वास असून मनपाला चांगलीच चपराक बसली. ते एकाच पक्षाचा धुरा वाहत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.